भौगोलिक माहिती
स्थानिकता
बहाद्दरपुरा हे गाव कंधार पासून पुर्वेस 03 की. मी. अंतरावर असून नांदेड जिल्ह्यापासून 52 कि. मी. अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 4264 असुन त्यापैकी पुरुष संख्या 2172 व स्त्रिया 2092 आहेत. सध्या लहान मोठ्यांची अंदाजे संख्या 5500 पर्यंत आहे. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शासकीय व निमशासकीय नौकरी,शेती व दुग्ध व्यवसाय आहे. 2 दुध डेअरी आहेत व 12 बचत गट आहेत. गावचे शेती क्षेत्र 149 हेक्टर आहे. गावाच्या उत्तर दिशेला राष्ट्रकुटकालीन किल्ला तर दक्षिण दिशेला मन्याड नदी आहे. गावामध्ये जि.प. शाळा मुलांची व मुलींची स्वतंत्र असून इयत्ता 01 ते 04 पर्यंत आहे. 5 वी ते 10 श्री शिवाजी हायस्कूल आहे. या शिवाय ST मुले व मुलींसाठी सद्गुरू आदिवासी आश्रम शाळा तर SC मुले व मुलींसाठी मातोश्री अनुसयाबाई घोलप आश्रम शाळा आहे. गावात आरोग्य उपकेंद्र व SBI बँक शाखा आहे. गावाला राजकिय वारसा आहे. या गावाने खासदार, आमदार, जि.प.सदस्य,पंचायत समिती सभापती अशी पदे भूषविली आहेत. गावात सर्व देवी-देवतांचे मंदिर, मस्जिद, बौद्धविहार, हुतात्मास्मारक सह राष्ट्रीय पुढाऱ्यांचे स्मारक आहेत. गावात मान-पान, जात-पात, बाटा-बाटी नसून सर्व जातीधर्मातील लोक एकोप्याने वागतात. सर्व सोयीसुविधानीयुक्त गाव म्हणून गावाचा परिचय आहे.
भौगोलिक संरचना
बहादरपुरा समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.
जलवायू
बहादरपुरा मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४0°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.
कृषी
बहादरपुरा मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे .
प्राकृतिक साधनांची उपलब्धता
बहादरपुरा च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.
संस्कृती आणि इतिहास
बहादरपुरा मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.